शिंदेगटातील आमदार महेंद्र थोरवेंसोबत अमित ठाकरे यांची 20 मिनिट चर्चा

कर्जत  –  शिंदे गटातील कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे (MLA Mahendra Thorve) आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली आहे. अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) प्रमुख असून त्यांनी महेंद्र थोरवे यांची घेतलेली भेट ही मुंबई आणि परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानानिमित्त अमित  ठाकरे कर्जत दौऱ्यावर आहेत. यावेळी महेंद्र थोरवे यांनी त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यानंतर दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर या दोन नेत्यांमध्ये संवाद झाला. मात्र चर्चेत नेमके कोणते मुद्दे होते, याविषयीचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही.