Jay Malokar | जय मालोकरांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या अमित ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनाचा समृद्धी महामार्गावर अपघात

Jay Malokar | जय मालोकरांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या अमित ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनाचा समृद्धी महामार्गावर अपघात

Jay Malokar | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर काल अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात अमोल मिटकरींना काही झाले नाही, मात्र त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. त्यांच्या गाडीच्या काचा मनसे सैनिकांनी फोडल्या आहेत. या राड्यानंतर हल्ल्यात सहभाागी असलेले मनसे कार्यकर्ते जय मालोकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे हे प्रकरण जास्तच तापले आहे. दरम्यान, आज राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे मृत मनसैनिक जय मालोकरच्या ( Jay Malokar) कुटुंबियांना भेट देण्यासाठी आले असताना त्यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाला.

मनसेचे नेते अमित ठाकरे हे आज दिवंगत मनसे कार्यकर्ता जय मालोकर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी अकोल्यात जात होते. जय मालोकार यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी अमित ठाकरेंचा ताफा समृद्धी महामार्गावरून मालेगाव येथून अकोल्याकडे जात होता. अकोल्याकडे येत असताना त्यांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर धडकल्या. समृद्धी महामार्गावरुन खाली उतरल्यानंतर अकोल्याकडे येताना पातुरजवळील भंडारज फाटा येथे ही घटना घडली आहे. सुदैवाने कुणालाही कोणतीही दुखापत नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Eknath Shinde | कुणाला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतोय; एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर

Eknath Shinde | कुणाला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतोय; एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर

Next Post
Karnabala Dunbale | "मिटकरींच्या तोंडाला मुळव्याध झालाय. त्याच्याविषयी काय चर्चा करायची”, मनसे नेते कर्णबाळा दुनबळे यांचा हल्लाबोल

Karnabala Dunbale | “मिटकरींच्या तोंडाला मुळव्याध झालाय. त्याच्याविषयी काय चर्चा करायची”, मनसे नेते कर्णबाळा दुनबळे यांचा हल्लाबोल

Related Posts
Vinesh Phogat : ऑलिम्पिक सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं, लढतीपूर्वीच विनेश फोगट अपात्र

Vinesh Phogat : ऑलिम्पिक सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं, लढतीपूर्वीच विनेश फोगट अपात्र

Vinesh Phogat :- पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यापूर्वी कुस्तीपटू विनेश फोगटला…
Read More
तू मला खुश कर, मी तुला पूर्ण मार्क देईन ; नराधम शिक्षकाची विद्यार्थिनीला ऑफर   

तू मला खुश कर, मी तुला पूर्ण मार्क देईन ; नराधम शिक्षकाची विद्यार्थिनीला ऑफर   

नवी दिल्ली-  गुरु-शिष्य या नात्याला पवित्र नाते मानले जाते मात्र या नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली…
Read More

सीमावर्ती भागातील जनतेचा स्वाभिमान गहाण पडला आहे का?

शंभूराजे फरतडे – करमाळा:  कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादावरुन सुरु असलेला गदारोळ पहाता  सीमावर्ती भागातील मराठी माणसांचे कर्नाटकात सामील होण्याचे…
Read More