संजय राऊतांच्या गौप्यस्फोटानंतर अमोल काळेचा मोठा खुलासा…

मुंबई : राज्यात सध्या राजकीय वाद मोठ्या प्रमाणावर बघायला मिळत आहे. किरीट सोमय्यांनावर आरोपांच्या फैरी झाडत असताना संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात २५ हजार कोटींचा महा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. या घोटाळ्यात अमोल काळे आणि विजय ढवंगाळे या दोघांची नावे संजय राऊत यांनी सांगितली आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देखील ट्विट केले आहे. तर अमोल काळेने याबाबत खुलासा केला आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महा आयटीमध्ये २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या घोटाळ्यात संजय राऊत यांनी अमोल काळे आणि विजय ढवंगाळे यांची नावे घेतली आहेत. तशापासून या प्रकरणाला नवी दिशा मिळाली. याबाबत अतुल लोंढे यांनी देखील एक ट्विट केले आहे.

अतुल लोंढे यांनी याबाबत ट्विट करत सवाल केला आहे की, संजय राऊत साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन उघड केलेल्या घोटाळ्यातील एक घोटाळेबाज लंडनला पळून गेल्याची माहिती मिळतेय. तो घोटाळेबाज अमोल काळे तर नाही ना ? कुठे आहे अमोल काळे ? त्यामुळे नेमका अमोल काळे कोण आहेत याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली होती.

अमोल काळे यांनी एका वृत्तवाहिनी केलेल्या खुलास्यात असं म्हटलं आहे की, गेली दोन दिवस माझ्या संदर्भात काही नेत्यांची वक्तव्य पाहण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांना मी सांगू इच्छितो की, मी खासगी व्यावसायिक मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे. माझ्या खासगी व्यवसायचे सर्व तपशील प्राप्तीकर विवरणात जमा आहेत. तसेच मी अजूनही भारतात आहे. परदेशात गेलेलो नाही. फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी माझी हेतुपुरस्सर बदनामी केली जात आहे. यावर मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितले.