Amol Kolhe :… यामुळे शिवनेरीवरील शिवजयंती सोहळ्यावर खासदार अमोल कोल्हे बहिष्कार टाकणार!

Pune – शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण खासदार अमोल कोल्हेंना आले आहेपण खासदार अमोल कोल्हेंनी या शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा फडकवण्याची मागणी पुर्ण न झाल्याने या कार्यक्रमावर बहिष्कार घातल्याचं कोल्हे म्हणाले.

नेमकं काय म्हणणे आहे अमोल कोल्हे याचं ?

बरीच वर्ष झाली मात्र अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान असलेल्या शिवनेरीवर अजूनही कायमस्वरुपी भगवा ध्वज नाही. 2021 पासून अनेक मंत्र्यांना आणि वरिष्ठ नेत्यांना भेटून मी किल्ले शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा ध्वज लावण्याची मागणी करत आहे. संसदेत देखील हा मुद्दा किंवा ही मागणी मी केली आहे.

एवढंच नाही तर संसदेच्या अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतलेल्या बैठकीतही मागणी केली होती. भगवा ही आमची अस्मिता आहे आणि शिवभक्तांचा फार मोठा गर्व आहे. या सगळ्यांचा आदर करुन महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे आग्रही भूमिका घ्यावी मात्र या दृष्टीने ठोस पावलं उचचली जात नाहीत. भगवा ध्वज नसल्याची जाणीव करुन देण्यासाठी मी शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहे, असं ते म्हणाले.