पेढे भरून आनंद साजरी करणारी तोंडं लवकरच काळी झालेली दिसतील – अमोल मिटकरी

मुंबई – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. राजीनाम्यानंतर भाजपच्या (BJP) गोटात आनंदाचे वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) 2019 च्या निवडणुकीवेळी म्हणाले अन् हा डायलॉग त्यांच्या नावासोबत कायमचा जोडला गेला. काहीवेळा हा डायलॉग त्यांच्या प्रगतीचं प्रतीक बनला तर कधी त्यांना याच डायलॉगवरून हिणवलं गेलं. पण त्यांचा हा डायलॉग सध्या खरा ठरताना दिसतोय. कारण राज्यात पुन्हा फडणवीस सरकार अस्तित्वात येईल अन् देवेंद्र पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी बसतील.

दरम्यान, या घडामोडींवर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, जय महाराष्ट्र ! एक सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची जनता शिवसेना (Shivsena)  पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांना कधीच विसरू शकणार नाही. कोरोना सारखी संकट, चक्री वादळ पेलणारे आपण,आज इतकेच सांगतो महाराष्ट्र गुजरातला विकल्याचा आनंद पेढे भरून साजरी करणारी तोंडं लवकरच काळी झालेली दिसतील.असं मिटकरी म्हणाले आहेत.