अमोल मिटकरी तुमची पंकजा मुंडेंवर बोलण्याएवढी उंची नाही- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई – गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे (Gopinath Munde, Eknath Khadse) यांच्या पुण्याईने भाजप पक्ष वाढला. मात्र सुडाचं राजकारण करून त्यांच्याच मुलीचा पराभव करण्यात आला. रोहिणी खडसेंना (rohini khadse) हे लक्षात आलं. मात्र पंकजा मुंडे यांच्याही लक्षात यायला पाहिजे. आता 12 आमदारांची यादी राज्यपाल लवकर मंजूर करतील. 12 आमदारांच्या यादीत पंकजा मुंडेंचं नाव नाही. त्यामुळे पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख कसे छाटतात दिसते आहे. एक प्रकारे रोहिणी खडसे या राष्ट्रवादीत आल्या. तशाच पंकजा मुंडेंनीही (Pankaja Munde) पाऊल उचलावं, अशी थेट ऑफर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पंकजा मुंडे यांना दिली आहे.

जळगावमधील बोदवड येथे रोहिणी खडसे यांनी संवाद यात्रेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी भाजपावर जोरदार टीका केली.दरम्यान, आता या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची पंकजा मुंडे यांच्यावर बोलण्याएवढी उंची नाही.असं ते म्हणाले.

पंकजा मुंडे रक्ताने भाजपच्या कार्यकर्ता आहेत, त्यांच्या रक्तात भाजप (BJP) आहे. त्या राष्ट्रीय नेत्या असून मध्य प्रदेशाच्या सह प्रभारी आहेत. ते कधीच भाजप सोडण्याचा विचार ही करू शकत नाही. त्यामुळे अमोल मिटकरी यांनी स्वप्न पाहू नये. जयंत पाटील (Jayant Patil) यांनीच अमोल मिटकरी यांना विचारणा करावी. तसेच मिटकरी यांनी त्यांच्या पक्षात काय सुरू आहे आणि त्यांच्या पक्षात येत्या काळात काय घडणार आहे, याकडे लक्ष द्यावे, असा चिमटा  चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काढला.