‘आज वसूली चालू है या बंद ?’, अमृता फडणवीस यांचा राज्य सरकारला टोला

amruta fadnvis

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या बंद संदर्भात व्यापाऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.

आजच्या महाराष्ट्र बंदवर भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अगदी शेलक्या शब्दांत सडकून टीका केली आहे. ‘आज वसूली चालू है या बंद ?’ अस म्हणत अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडीला चांगलाच चिमटा काढला आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्र बंद पुकारून महाविकास आघाडी सरकारने निव्वळ ढोंगीपणा केला आहे. या नेत्यांना शेतकर्‍यांप्रति खरोखर कणव असेल तर आजचा बंद मागे घेण्यापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=XjmHK3oCVPg&t=2s

 

Previous Post
obc morcha

ओबीसी जनगणना व आरक्षणाच्या मागणीसाठी वंचितचे जामखेड तहसील कार्यालयावर यल्गार मोर्चा

Next Post
amruta fadnvis - rupali chaknakar

‘संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी’

Related Posts
उलटतपासणीला न येणं ठाकरेंना पडलं महागात; नार्वेकरांनी दाखवून दिली चूक 

उलटतपासणीला न येणं ठाकरेंना पडलं महागात; नार्वेकरांनी दाखवून दिली चूक 

Shivsena MLA Disqualification Case Verdict  : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) जाहीर…
Read More
sharad pawar

सर्वधर्मसमभाव मानणार्‍या सर्वांनी आपापसातील बंधुभाव टिकवण्यासाठी प्रयत्न करा – शरद पवार

मुंबई  – देशाच्या राजधानीत दिल्लीत एकप्रकारचा वेगळे वातावरण निर्माण केले जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief…
Read More

मनसेचा पाठींबा जगताप- रासने यांनाच; संभ्रम निर्माण करणाऱ्यांना मनसेचे सडेतोड उत्तर 

पुणे : कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे प्रचार करताना मनसेच्या (MNS) कार्यालयात गेले होते. यावरून उलटसुलट चर्चा…
Read More