भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या संतप्त कार्यकर्त्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

Mumbai – विधानपरिषद निवडणुकीसाठी (MLC election) भाजपने  प्रवीण दरेकर (Pravin Darekar), राम शिंदे (Ram Shinde), प्रसाद लाड (Prasad Lad) आणि श्रीकांत भारतीय यांच्यासह उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ (Pankaja Munde and Chitra Wagh) यांना मात्र संधी मिळालेली नाही, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवाल्या आहेत.

दरम्यान,  पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांना सुरवातीला राज्यसभेचे व नंतर विधानपरिषदेच्या उमेदवारीचे तिकीट भाजप पक्ष श्रेष्ठींनी दिले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पंकजा मुंडे समर्थक असलेल्या भाजप कार्यकर्त्याने भर पत्रकार परिषदेत विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न (Attempted suicide) केला.

अहमदनगर (Ahmednagar)  जिल्ह्यातील पाथर्डी येथे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले भाजप कार्यकर्ते मुकुंद गर्जे (Mukund Garje) यांनी विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न करत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर मुकुंद गर्जे यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात (Pathardi Sub-District Hospital) दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.