आनंद दवे यांची झाली पंचाईत; सहकाऱ्यांनीच प्रचार थांबवला, जाणून घ्या नेमकं काय घडलं

पुणे:  हिंदू महासंघाचे आनंद दवे (Anand Dave) यांचा प्रचार आता एका पक्षाच्या बाजूने तर एक पक्षाच्या विरुद्ध असा एकांगी सुरू आहे. हिंदू महासंघ जिंकावा म्हणून हा प्रचार सुरू नसून, भाजपच्या हेमंत रासने यांच्याविरोधात सुरु आहे, असा आरोप हिंदू महसंघाचे कार्यकारणी सदस्य आणि ब्राह्मण महासंघाचे उपाध्यक्ष रोहित धोत्रे (Rohit Dhotre) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

धोत्रे म्हणाले, जसा जसा प्रचार पुढे गेला तसा आनंद दवे यांनी एकांगी प्रचार सुरू केला. त्यांच्याकडून मविआचा अजेंडा फॉलो होत आहे. भाजपचा उमेदवार पडावा म्हणून हा प्रचार सुरू आहे. प्रचाराच्या काळात भाजपकडून एकत्र वेगळे न लढता एकत्र लढवू अशी विचारणा झाली होती. प्रचाराच्या काळात पदाधिकाऱ्यांना विचारात न घेणे, भाजपचा हिंदू मतदार तोडणे अशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे मी दवे यांचा प्रचार करणे थांबविला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

https://youtu.be/Jxl-PvjRxzw