आनंद परांजपे यांच्या अडचणी वाढल्या; मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी चार पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

Thane – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याविरोधात अपशब्द वापरणं राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (National Congress Party) ठाणे जिल्हाध्यक्ष (Thane District President) आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांना चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. कारान आनंद परांजपे (NCP Thane District President Anand Paranjape) यांच्या विरोधात चार पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्यानं हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भादंवि 153, 501, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. कल्याणमधील (Kalyan News) बाजारपेठ आणि कोळसेवाडी, डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेत.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख महेश गायकवाड, शहर प्रमुख रवी पाटील, महिला जिल्हाप्रमुख छाया वाघमारे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कल्याण डोंबिवलीतील विविध पोलीस ठाण्यात परांजपे यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आली होती. यासंदर्भात बाळासाहेबांचे शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांनी काल डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेतली. त्यांना देखील निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

या प्रकरणी कल्याणमधील बाजारपेठ आणि कोळसेवाडी पोलीस ठाणे तर डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलीस ठाणे या चार पोलीस ठाण्यांत परांजपे यांच्या विरोधात भादवी 153, 501, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case under IPC 153, 501, 504 has been registered against Anand Paranjape.). आता पोलीस पुढे काय कारवाई करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.