आनंदी आनंद गडे : अवघ्या दोन महिन्यात आलियाने दिली गुड न्यूज

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आता आई होणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. आलिया आणि रणबीरचे आई-वडील झाल्याची माहिती जाणून चाहत्यांना धक्का बसला आहे. आलियाने रणबीरसोबतचा हॉस्पिटलचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना  तिने लिहिले – आमचे बाळ लवकरच येणार आहे.

आलिया भटने तिच्या official Instagram account वरून एक फोटो शेअर करत, आमचं बाळ येतंय (Alia Bhatt -Ranbr Kapoor announce pegnancy), अशी गोड बातमी दिली.  14 एप्रिलला या दोन बॉलिवूड स्टार्सनी लग्नगाठ बांधली होती. 14 एप्रिलला काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा (Alia bhatt Ranbir Kapoor Wedding ) थाटात पार पडला. या लग्नाला काही बॉलिवूड सेलेब्सनी हजेरी लावली होती. जवळपास 5 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी लग्न केलं आणि अवघ्या काही महिन्यात गुड न्यूज दिली.

आलिया भट्टने थेट हॉस्पिटल किंवा क्लिनिकमधल्या सोनोग्राफीरूममध्ये काढलेला फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत pregnancy ची बातमी दिली आहे. या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ही बातमी खरीच आहे की प्रमोशन साठी केलेला एक अट्टाहास आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.