अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर; शिवसेनेतील फुटीनंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक

मुंबई : शिवसेना आमदार रमेश लटके (ramesh latke) यांच्या निधानामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व (Andheri East) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे.

या निवडणुकीत शिवसेनेकडून (shivsena) लटके यांच्या पत्नीला तिकीट दिलं जाणार आहे. तर भाजपतर्फे मुरजी पटेल (Murji Patel) हे उमेदवार असणार आहेत. शिवसेनेतील फुटीनंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक असणार आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची आणि प्रतिष्ठेची होणार असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. (Andheri East Legislative Assembly by-election announced; This is the first big election after the split in Shiv Sena).

अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीही एक ट्वीट केलं होतं. ते म्हणाले आहेत की, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं अंधेरी पूर्व येथे निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आज करण्यात आले. भाजप आणि शिंदे गट युतीचे उमेदवार श्री. मुरजीभाई पटेल यांना स्थानिकांचा भरघोस पाठिंबा असल्याचं यावेळी दिसलं. यामध्ये ट्वीटमध्ये आशिष शेलार यांनी मुरजी पटेल यांचा उल्लेख भाजप आणि शिंदे गट युतीचे उमेदवार असा केला आहे.