आंध्र प्रदेशला पुराचा बसला फटका; शेतीसह पशुधनाचीही झाली मोठी हानी 

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला अवेळी पाऊस आणि पुराचा फटका बसला आहे. रायलसीमा राज्य आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवरील भातशेतीला याचा मोठा फटका बसला आहे. पुरामुळे हरभरा पिकाचे आणि पाणी योजनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सल्लागार कुणाल सत्यार्थी यांनी राज्य सरकारच्या अधिका-यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केलं आहे. वाय. एस. आर. कडप्पा जिल्ह्याचे जास्त नुकसान झाले असून, पशुधनाचीही मोठी हानी झाली आहे.

दरम्यान, इकडे कोकण किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे उद्या सकाळपर्यंत उत्तर कोकण, उत्तर आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वीजा आणि वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

हे देखील पहा