‘बाळासाहेब सोनियांची लाचारी करणाऱ्याला XXX म्हणत होते आणि ती लाचारी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर आणली’

मुंबई – राज्यात नवी सत्तासमीकरणं जुळण्याची चर्चा सुरू झाली असून औरंगाबादमध्ये एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जाण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि एवढंच काय तर शिवसेनेसोबतची जाण्यास आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य त्यांनी केलंय.

एमआयएममुळे प्रत्येक निवडणुकीत मतांचे विभाजन होते आणि भाजपाचा विजय होतो, असा आरोप अनेकदा केला जातो. हा आरोप भविष्यात एमआयएमवर केला जाऊ नये, यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रस्तावावर विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या आघाडीसाठी अनुकुलता दर्शविली आहे.

दरम्यान काल मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी हा प्रस्ताव फेटाळला असून भाजप आणि एमआयएमवर टीका देखील केली आहे. आता या टीकेला भाजप नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केलीय. ‘बाळासाहेब सोनियांची लाचारी करणाऱ्याला XXX म्हणत होते आणि ती लाचारी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर आणली’, अशा शब्दात बोंडे यांनी सेनेवर आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

बोंडे म्हणाले, हिंदू शिवसेनेची साथ सोडत आहेत म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. शिवसेना आता शरद पवारांची बी टीम म्हणून काम करतेय. गोवा, उत्तर प्रदेशात हिंदू समाजानं शिवसेनेला ‘नोटा’खाली झोपवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर बांधून बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करत आहेत. बाळासाहेब सोनियांची लाचारी करणाऱ्याला XXX म्हणत होते आणि ती लाचारी आता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर आणल्याचा घणाघात बोंडे यांनी केलाय.TV9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.