ज्यांनी पाप केलं, त्यांची धुग धुग वाढली असेल, अनिल बोंडे यांचा विरोधकांवर निशाणा 

मुंबई – भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी खळबळजनक ट्वीट्स केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचा एक मोठा नेते लवकरच तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख (Nawab Malik and Anil Deshmukh) यांना भेटणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. संबंधित ट्वीट जतन करून ठेवा, असा विश्वासही त्यांनी ट्वीटमधून व्यक्त केला आहे. या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

“माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा!”, असं सूचक इशारा देणारं ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय. सोबतच सिंचन घोटाळा प्रकरणाची (Irrigation Scam Case) पुन्हा चौकशी झाली पाहिजे, 2019 मध्ये परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी चौकशी बंद केली होती!, असं ट्विट कंबोज यांनी केलं आहे.

याशिवाय मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचाी पोलखोल करणार आहे त्यात देशातील आणि परदेशातील मालमत्तेची यादी, बेनामी कंपन्या, गर्ल फ्रेंड्सच्या नावावरील मालमत्ता, विविध पोर्टफोलिओमध्ये मंत्री म्हणून केलेला भ्रष्टाचार ,कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्ता यादी!, अस ट्विट कंबोज यांनी केलंय.

दरम्यान, कंबोज यांच्या या ट्वीट नंतर आता राष्ट्रवादीचे अनेक नेते आत त्यांच्यावर टीका करत आहेत. एका बाजूला हे चित्र असताना दुसऱ्या बाजूला भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. मोहित कंबोज यांच्या ट्वीटमुळे (Tweet) अनेकांची धडधड निश्चितच वाढली असेल. आता कोणाचा नंबर लागणार आहे. हे मोहित कंबोज यांनाच माहीत असेल आहे, अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी दिली.

अनिल बोंडे म्हणाले, अ वरचा नेता जाणार आहे की ब वरचा नेता जाणार आहे. शिवसेनेचा जाणार की कोणत्या पक्षाचा जाणार आहे. परंतु तेवढी गोष्ट खरी आहे ज्यांनी ज्यांनी पाप केले आहे त्याच्या मनात धुग धुग् वाढली असेल येवढं निश्चित आहे. अनिल बोंडे म्हणाले, कोणताही घोटाळा असो त्याची फाईल बंद करू नये. जोपर्यंत त्यामध्ये काही केलेले नाही असं सिद्ध होईल किंवा शिक्षा झाली पाहिजे. कारण ही लोकांची भावना आहे. लोकांना वाटतं की जनतेचा पैसा कोणी नेता खात असेल तर त्याला तो पैसा पचू नये. ही जनतेची भावना देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार त्याचा आदर करतील.असं ते म्हणाले.