राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP News) ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’पदी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील आणि माजी आमदार लहू कानडे यांची प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज नियुक्ती केली आहे.
दरम्यान अनिल भाईदास पाटील यांच्यावर जळगाव, नंदुरबार व धुळे जिल्हा संघटनेच्या प्रभारी पदाची तर लहू कानडे यांच्यावर सामाजिक न्याय विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सोपवली आहे.
पक्ष (NCP News) वाढीसाठी व पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न कराल असा विश्वास व्यक्त करतानाच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मनसे नेत्यांना शिवसेनेत आणण्याचा प्रयत्न? राज ठाकरे संतापले!
शरद पवारांचं राजकारणातलं स्टेटस मोदींपेक्षा मोठं, पंतप्रधानांच्या त्या कृतीनंतर राऊतांची प्रतिक्रिया
आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाणार? भगव्या स्टेटसने राजकीय चर्चांना उधाण