पशुंवर्धन मंत्र्यांचं जिल्ह्यातच लक्ष नाही ? 3 दिवसांत एकाच गोठ्यातील 14 गाईंचा मृत्यू

अहमदनगर : नेवासा तालुक्यातील लोहगाव येथे तीन दिवसात पण 14 गाईंचा मृत्यू झाला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. सुरुवातीला चार गाईंचा मृत्यू झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने उपचार सुरू केले. उपचार सुरू असतानाही तब्बल आठ गाईंचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी धास्तावले आहेत.

पशुसंवर्धन विभागाकडून उपचार सुरू असताना मृत्यू होतोच कसा असा प्रश्न उपस्थित करत शासनाने याबाबत तातडीने गुन्हा दाखल करून चौकशी करावी व लोहगाव येथे उपचारासाठी विशेष पथक पाठवावे, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी केली आहे.

नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील लोहगाव येथे गेल्या चार दिवसापासून गोठ्यातील गाईंचा मृत्यू होत आहे तीन दिवसात तब्बल 14 गाईंचा मृत्यू झाला. असून अजूनही काही गाई गंभीर अवस्थेत आहेत. मुळात पहिल्या दिवशी चार गाईंचा मृत्यू झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने अन्य अत्यावस्थ गाईंवर उपचार सुरू केले. उपचार सुरू असतानाही तब्बल आठ गाईंचा मृत्यू झाला ही बाब अत्यंत विचार करायला लावणारी आहे. पशुसंवर्धन विभागाला या प्रकरणाचे गांभीर्य नाही का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

अजूनही या भागात काही गाई अत्यावस्थ स्थितीत आहेत. उपचार सुरू असूनही गाईंचे मृत्यू थांबत नसल्याने या भागातील शेतकरी दूध उत्पादक प्रचंड दस्तावले आहेत या गाईंचा मृत्यू विसबाधेनने झाल्याचे पशुसंवर्धन विभाग सांगत असला तरी, नेमका मृत्यू विष बाधेने झाला की अन्य कारणांनी हे कळायला तयार नाही. त्यामुळे शासनाने या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी करावी व उपचारासाठी तातडीने विशेष पथक नेमून येथील जनावरावर उपचार करावे. तसेच नेमक्या कोणत्या कारणाने जनावरांचा मृत्यू झाला हे स्पष्ट करावे अशी मागणी संभाजीराजे दहातोंडे यांनी केली आहे.

तातडीची मदत करा

गाईंचा अचानक मृत्यू झाल्याने लोहगाव येथील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी उध्वस्त झाले असून शासनाने तातडीने दखल घेत तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी संभाजी दहातोंडे यांनी केली. याबाबत आपण दोनच दिवसांमध्ये मुख्यमंत्री व मुख्य मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.