सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ( Anjali Damania) यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करत त्याच्या पोलीस संरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला पोलीस संरक्षण का आणि कसे मिळाले, असा सवाल त्यांनी केला आहे.
पोलीस विभागाने दावा केला आहे की, वाल्मिक कराडचे पोलीस संरक्षण 11 डिसेंबरला रद्द करण्यात आले. मात्र, अंजली दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, कराड फरार असताना तो उज्जैनला गेला होता आणि त्यावेळी त्याच्या सोबत पोलीस होते.
याशिवाय, कराडने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोवरूनही वाद निर्माण झाला आहे. दमानिया ( Anjali Damania) यांचा दावा आहे की, तो फोटो कराडसोबत असलेल्या दुसऱ्या अंगरक्षकाने काढला होता, ज्यावरून त्याला अद्याप पोलीस संरक्षण मिळत असल्याचे स्पष्ट होते.
या प्रकरणावरून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. अंजली दमानियांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी केली आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
भाजप सत्ताधारी आणि प्रशासनाने मिळून पुण्याची जागतिक नाचक्की करून दाखवली : Aam Aadmi Party
हिंदुत्वाचा अजेंडा नेण्यासाठी भाजप मंत्र्यांना संघाचे नेते कानमंत्र देणार
फडणवीसांनी करुणा शर्माला अनेकदा विमानाने माहेरी सोडलं | Trupti Desai