अंकिता- अभिज्ञाची घायाळ अदा: माधुरी दीक्षितच्या गाण्यावर धरला ठेका

कलाविश्वात फार मोजके असे सेलिब्रिटी पाहायला मिळतात जे पडद्यामागेही एकमेकांचे चांगले मित्र किंवा मैत्रिणी आहेत. यातलीच एक जोडी म्हणजे अंकिता लोखंडे आणि अभिज्ञा भावे. या दोघीही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी असून अनेकदा सोशल मीडियावर त्या एकमेकींसोबतच फोटो वा व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या या दोघी ‘पवित्र रिश्ता’च्या दुसऱ्या भागात झळकत आहेत. या सेटवरील अनेक फोटो, व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. यामध्येच त्यांनी माधुरी दीक्षितच्या एका गाण्यावर डान्स केला आहे.

अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवर पवित्र रिश्ताच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिज्ञा आणि अंकिता या दोघी जणी सैलाब चित्रपटातील ‘हम को आज कल है इंतजार…’या गाण्यावर डान्स करतांना दिसत आहेत. विशेष म्हणजे या दोघींनी एक्स्प्रेशन्स आणि डान्स स्टेप्स अगदी माधुरी सारख्या फॉलो केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा हा व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत आहे.