हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता होणार ठाकरे घराण्याची सून

अंकिता पाटील

पुणे : माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या कन्या अंकिता या आता ठाकरे घराण्याची सून होणार आहे. निहार बिंदूमाधव ठाकरे यांच्याशी येत्या 28 डिसेंबर रोजी त्यांचा विवाह होणार आहे. गेले काही दिवस या दोघांच्या विवाहाची चर्चा होती. त्याची अधिकृत माहिती आज जाहीर झाली.

अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. तर निहार यांचे एलएलएम पर्यंत शिक्षण झाले असून त्यांनी वकिली व्यवसायात जम बसविला आहे. अंकिता यांनी लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्समध्ये आणि एक वर्ष हार्वर्डमध्येही शिक्षण घेतले आहे. इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या त्या सदस्या आहेत.

निहार ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत.. निहार यांच्या वडील बिंदुमाधव यांचे 1996 मध्ये अपघाती निधन झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका आहेत, तर राज ठाकरे हे त्यांचे सख्खे चुलत काका आहेत. निहार ठाकरे हे पेशाने वकील आहेत.

अंकिता पाटील यांनी फेसबुकवरुन राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. राज ठाकरेंची मुंबईत भेट घेतली, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी अंकिता पाटलांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती आहे.

 

Previous Post
nana

भाजपा व आरएसएस यांचा अजेंडाच मुळात आरक्षण संपवण्याचा आहे : नाना पटोले

Next Post
sharad pawar

‘राष्ट्रवादी काँग्रेसमधील सरंजामशाही प्रवृत्तींना ओबीसी समाजाचे राजकारणातील अस्तित्व खुपते आहे’

Related Posts

श्रीनगर येथे महाराष्ट्र भवनासाठी जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची लेफ्टनंट गव्हर्नर यांना विनंती

मुंबई –श्रीनगर (Shrinagar) येथे महाराष्ट्र भवन (Maharashtra Bhavan) उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath…
Read More
Pankaj Gore | खान्देशाचे कान्हादेश नामकरण करावे, ऍड. पंकज गोरे यांची साहित्य महामंडळाकडे मागणी

Pankaj Gore | खान्देशाचे कान्हादेश नामकरण करावे, ऍड. पंकज गोरे यांची साहित्य महामंडळाकडे मागणी

Pankaj Gore : खान्देशाचे कान्हादेश असे नामकरण करण्यात यावे तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर…
Read More
raj thackeray

‘भाऊ मुख्यमंत्री झाल्याच्या त्रासाने होणारी राज ठाकरेंची तडफड संपूर्ण देश व महाराष्ट्र बघत आहे’

  मुंबई –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे  ( Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray ) यांची बहुचर्चित…
Read More