Shikhar Bank Scam | शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारेंचा आक्षेप

Ajit Pawar Shikhar Bank Scam | लोकसभा निवडणुकीपूर्वी शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र या घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे. कारण आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे  (Anna Hazare) यांनी आक्षेप घेताला आहे.

महत्त्वाच म्हणजे न्यायालयाने त्यांचा हा आक्षेप मान्य केला आहे. याबद्दल निषेध याचिका दाखल करण्यासाठी अण्णा हजारे यांना वेळ दिलाय. गुरुवारी 13 जूनला विशेष सत्र न्यायालायचे न्यायमूर्ती राहुल रोकडे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. याप्रकरणाची पुढील सुनावणी 29 जूनला होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावणी दरम्यान कोर्ट काय भूमिका घेतेय हे पहावं लागणार आहे.

राज्यातील बहुचर्चित तब्बल 25 हजार कोटी रुपयांच्या शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी (Shikhar Bank Scam) अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचं नाव समोर आलं होतं. मात्र  मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या घोटाळ्या प्रकरणी त्यांना क्लिनचिट मिळाली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत हा दिलासा देण्यात आला होता.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like