आणखी एक आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत

मुंबई – शिवसेना नेते राजन सावळी (Rajan Savli) हे शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील आमदारांच्या ते संपर्कात असून राज्याचे सध्या अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान, साळवी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांची भेटही घेतली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला आणखी एक धक्का बसू शकतो अशी चर्चा आहे.

साळवी हे लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार असून ते शिवसेनेचे (Shivsena) उपनेतेही आहेत. कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी विरोध केला आहे. तर आमदार राजन साळवी यांनी अधिक आक्रमकपणे या प्रकल्पाचं समर्थन केलं आहे. काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) कोकण दौऱ्यावर होते. त्यांनीदेखील रिफायनरीबाबत अनुकूल भूमिका घेतली होती.