सोशल मीडियावर ही जमात येते कुठून ? थेरगाव क्वीनचा आणखी एक राडा व्हिडीओ व्हायरल

पिंपरी : थेरगाव क्वीनला पोलिसांनी सोशल मीडियावर अश्लील भाषेत शिव्या आणि धमकीचे व्हिडीओ अपलोड केल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी तीचं समुपदेशन करून तिला सोडून दिलं. पोलिसांना तिने सांगितले की, यापुढे असे व्हिडीओ तयार करणार नाही. पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच तिचा आणखी एक राडा घालणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

थेरगाव क्वीनचे सोशल मीडियावर जवळपास ४१ हजार फॉलोअर्स आहेत. फॉलोअर्स वाढविण्यासाठी अश्लील शिव्यांचे आणि धमकी देणारे व्हिडीओ तयार करीत होते. यासाठी साक्षी श्रीमाळ, साक्षी कश्यप आणि कुणाल कांबळे यांनी इन्टाग्रामवर अकाउंट ‘थेरगाव क्वीन’ नावाने आकाउंट तयार केले. त्याच्या माध्यमातून ते लोकांना धमकी आणि शिव्या देत होते. पुणे पोलिसांना समजात त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्या वर कारवाई करण्याचे पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी पोलिसांना आदेश दिले. त्यानंतर त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले.

सोशल मीडियावर थेरगाव क्वीनचा अजून एक राडा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तीच्या त्या व्हिडीओच्या मागे मोठी हस्ती आहे आपण. तीनपाट थोडीच आहे. ढगात आहे ना आपण, खालनं किती पण दगडं मारू द्या. आपल्यापर्यंत येत नाहीत भाऊ कुणाची दगडं. अख्खा ब्रह्मांडाला शनि बोलून एकटा मी बास होतो, आमच्या बरोबर चालण्याचा बी त्रास होतो, नींद हराम करतो. असं गाणं वाजताना दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/CZmM3Kag6LO/?utm_medium=copy_link

 

सोशल मीडियावर थेरगाव क्वीन बद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या मानसिकतेची कीव येते. सोशल मीडियावर अशी जमात येतेच कुठुन? यांना चांगलं मार दिला पाहिजे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या आहेत.