‘हिंदुत्वविरोधी एमआयएम – सपा पक्षांशी हातमिळवणी केली… एवढं करूनही शिवसेनेला विजय मिळालाच नाही’

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha elections) महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची अनेक मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा (Dhananjay Mahadik) विजय झाला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे.

शिवसेनेच्या उमेदवाराच्या पराभवानंतर  आता विरोधकांच्या निशाण्यावर शिवसेना आली आहे. मनसेचे नेते योगेश खैरे (MNS leader Yogesh Khaire) यांनी या मुद्द्यावरून सेनेवर निशाणा साधला. ते म्हणाले, संभाजीनगरमधे (Sambhajinagar)  एमआयएमची स्क्रिप्ट वाचली…. त्यांच्या नाकदुऱ्या काढून त्यांची मतं मिळवली… या ‘हिंदुत्वविरोधी’ एमआयएम – सपा पक्षांशी हातमिळवणी केली… एवढं करूनही विजय मिळालाच नाही. एका राज्यसभा जागेसाठी आपण काय पणाला लावत आहोत याचं भान ठेवायला पाहिजे होतं !! असं खैरे यांनी म्हटले आहे.