करीना आणि अमृता व्यतिरिक्त करण जोहरच्या घराचीही स्वच्छता केली जाणार, बीएमसीने घेतला निर्णय

मुंबई: बॉलिवूडची बेबो करीना कपूर आणि तिची बेस्ट फ्रेंड अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीएमसी सतर्क झाली आहे. संसर्गाचा आणखी प्रसार रोखण्यासाठी बीएमसीने मोठे पाऊल उचलले आहे. आज मंगळवारी, बीएमसीने करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोघींच्या इमारतींमध्ये कोविड चाचणी शिबिर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

बीएमसीचे डॉक्टरांचे ग्रुप दोन्ही अभिनेत्रींच्या इमारतीत आरटी पीसीआर चाचणी करणार आहे. याशिवाय बीएमसी टीम करीना आणि अमृता अरोरा यांच्या बिल्डिंग कंपाऊंड आणि इतर ठिकाणांची स्वच्छता करेल. त्याचवेळी, चित्रपट निर्माता करण जोहरच्या घराची स्वच्छता केली जाणार असल्याची बातमी येत आहे. कारण करीना आणि अमृता ज्या पार्टीत गेल्या, ती पार्टी करणच्या घरी झाली आणि तिथून कोविडच्या लागण झाली. एका सूत्राने सांगितले की, करण जोहरची सोमवारी कोरोना चाचणी झाली होती, ज्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याच्याबद्दल काळजी करण्यासारखे काही नाही, त्याची तब्येत पूर्णपणे ठीक आहे.

करीना कपूर खानबद्दल बोलायचे तर तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यापासून ती होम आयसोलेशनमध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीएमसी दररोज अभिनेत्रीचे आरोग्य अपडेट घेणार आहे. याशिवाय करिनाच्या घरातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी झाली आहे. मात्र, आजपर्यंत त्यांच्या कुटुंबातील एकाही सदस्यात कोरोनाची लक्षणे दिसलेली नाहीत. आता फक्त त्याच्या कुटुंबीयांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. बीएमसीच्या 5 अधिकाऱ्यांच्या टीमने अभिनेत्रींची कोरोना टेस्ट केली आहे आणि खास करून करीना कपूरच्या स्टाफची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.

करीना आणि अमृता अरोरा यांच्याशिवाय सोहेल आणि संजय कपूर यांच्या पत्नी महीप कपूर आणि सीमा खान यांनाही कोरोना झाला आहे. कारण हे चौघेही एकमेकांच्या संपर्कात आल्या होत्या. बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये कोरोनाची लागण होताच बीएमसी हाय अलर्टवर आहे. सोमवारी एक पोस्ट शेअर करत करीना कपूरने सांगितले की, तिला आता बरे वाटत आहे आणि ती लवकरच बरी होईल.

तर सीमा खानला पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. जी ८ डिसेंबरला करण जोहरच्या घरी गेट टुगेदर पार्टीला गेली होती . या पार्टीत करीना कपूर खान आणि अमृता अरोराही दिसल्या होत्या. ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. 11 डिसेंबरला चाचणी केल्यानंतर सीमा खानचा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती . याबाबत माहिती मिळताच करीना कपूर खान आणि अमृता अरोरा यांचीही कोरोना चाचणी झाली. ज्यामध्ये ते दोघेही संक्रमित आढळल्या . आता या दोन्ही अभिनेत्रींनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना चाचणी घेण्याचे आवाहन केले आहे.