दुचाकी वाहनांसाठी लवकरच नवीन मालिका, आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

two wheeler

पुणे : खाजगी दुचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्याकरिता तसेच उर्वरित क्रमांक दुचाकींसाठी राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी-चिंचवड पुणे यांनी केले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास नागरिकांना तो विहित शुल्क भरुन सुलभतेने मिळावा यासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० वा. आणि २८ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत कार्यालयाच्या नविन नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करणे आवश्यक राहील. डीडी ‘डीवाय.आर.टी.ओ. पिंपरी चिंचवड’ या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा. त्यासोबत अर्जदारास पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील.

अर्जासोबत केंद्रिय मोटार वाहन नियम 1989 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मध्ये नमूद केलेल्या पत्त्याच्या (वीज देयक, दूरध्वनी देयक आदी) पुराव्याची आणि ओळखीसाठीच्या (आधार ओळखपत्र, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पारपत्र (पासपोर्ट), पॅन कार्ड आदींपैकी एक) छायाचित्र ओळखपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी लागेल.

चारचाकीची यादी २८ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांनी लिलावाकरीता जास्त रक्कमेचा एकच डीडी २८ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावा व त्याच दिवशी दुपारी ३.३० वा. उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कक्षात नोंदणी प्रधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधित अर्जदार) लिफाफे उघडण्यात येतील. एका पसंतीक्रमासाठी जास्तीत जास्त रक्कमेचा डीडी सादर केलेल्या अर्जदारास संबंधित पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

तसेच चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या क्रमांकाव्यतिरिक्त अन्य क्रमांकांची दुचाकीसाठी यादी २९ ऑक्टोबर २०२१ रोजी कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. दुचाकीसाठी अर्जदारांना लिलावाकरिता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्यांनी २९ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी २.३० पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा व त्याच दिवशी दुपारी ३.३० वा. उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कक्षात नोंदणी प्रधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्र व्यक्तीसमोर (संबंधित अर्जदार) लिफाफे उघडण्यात येतील. एका पसंतीक्रमासाठी जास्तीत जास्त रक्कमेचा डीडी सादर केलेल्या अर्जदारास संबंधित पसंती क्रमांक वितरीत केला जाईल. वाहन क्रमांक आरक्षित केल्याचे मेसेज मोबाईलवर आल्यानंतर पाचव्या दिवशी पावती कार्यालयातून घेऊन जावी.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा होईल व फी सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=ozxI1_JoKsI&t=8s

Previous Post
शोभेची दारु व फटाके विक्री परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शोभेची दारु व फटाके विक्री परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
देशप्रेमाच्या गप्पा मारणारे भाजपा सरकार ‘सरदार उधम’च्या ऑस्कर मुद्द्यावर गप्प का ?

देशप्रेमाच्या गप्पा मारणारे भाजपा सरकार ‘सरदार उधम’च्या ऑस्कर मुद्द्यावर गप्प का ?

Related Posts

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, रोहित शर्मा फिटनेस चाचणीत उत्तीर्ण

मुंबई – 2022 च्या वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे. मर्यादित षटकांचा नवा कर्णधार रोहित…
Read More
हे आई-मुलाचे नाते, त्याच भावनेतून पोज दिल्या; विद्यार्थ्यासोबतच्या फोटोशूटवर मुख्याध्यापिकेचे स्पष्टीकरण

हे आई-मुलाचे नाते, त्याच भावनेतून पोज दिल्या; विद्यार्थ्यासोबतच्या फोटोशूटवर मुख्याध्यापिकेचे स्पष्टीकरण

Teacher Romantic Photoshoot with Student: शाळेच्या वतीने मुलांना शैक्षणिक दौऱ्यावर नेण्याची जबाबदारी शिक्षकांची असून अनेकदा मुले शाळेच्या सहलीवर जातात.…
Read More
अजित पवार 

शिंदे-फडणवीस सरकार सपशेल अपयशी,सहा महिन्यात राज्य हिताचे कामच झाले नाही-  अजित पवार 

नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेत येऊन सहा महिने झाले असले तरी अजून राज्याच्या हिताच्या दृष्टीने काम सुरु झालेले…
Read More