लातूर :- जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय दुसऱ्या कॅम्पचे उदगीर येथील पंचायत समितीच्या सभागृहात उदगीर तालूक्यातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थाच्या सभसदाकरीता दि. 26 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त मत्स्यकास्तकारांनी सदर कॅम्पला उपस्थित राहुन किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय ह.रा. बिरादार यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील मच्छिमार / मत्स्यकास्तकार यांना किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card-KCC) उपलब्ध् करुन देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.महाराष्ट्रातील मत्स्यकास्तकारांना मत्स्यव्यवसाय संबधीत कामे करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज भासते. उदा.मत्स्यबीज व खाद्य खरेदी, जाळे खरेदी, नौका खरेदी, बर्फ खरेदी, तलाव ठेक्याने घेतांना भाडेपट्टीची पुर्ततेसाठी अर्थसहाय्य इत्यादी करीता भांडवलाची आवश्यकता लागते.
किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा लाभ घेतल्यास मच्छिमार / मत्स्यकास्तकारांना पूढील प्रमाणे लाभ होईल. सोप्या पध्दतीने अर्थसहाय्य उपलब्ध् होईल, प्रत्येक कामाच्या कर्जाकरीता अर्ज करण्याची गजर राहणार नाही. मच्छीमाराच्या सवडी व निवडी प्रमाणे मत्स्यबीज, मत्स्यखाद्य व इतर साहित्य खरेदी करण्यास मदत होईल, कर्जाची सुविधा – हंगामी मुल्यांकनाची गरज नाही, मच्छिमारासाठी व्याजाचा भार कमी करणे शक्य होईल व कोणालाही खात्री लायक पणे कर्ज मिळण्याची हमी, जास्तीत जास्त कर्जाची मर्यादा मत्स्य उत्पन्नावर आधारीत. रु. 2.00 लाख पर्यंत अर्थसहाय्य मच्छिमार / मत्स्यकारांना मिळू शकेल.
केंद्र शासन मत्स्यव्यवसाय विभागाच्या पत्रकान्वये 15 नोव्हेंबर 2021 ते 15 फेब्रुवारी 2022 या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभाग व केंद्र शासनाचे वित सेवा विभाग राष्ट्रीय किसान क्रेडीट कार्ड वितरण मोहिम राबविणार असल्याचे कळवून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना व कार्यान्वयन प्रणाली नुसार कार्यवाही करण्याचे निर्देशित केले आहे.
लातूर जिल्हयातील अहमदपूर तालुक्यातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थाच्या सभासदाकरीता शासकीय विश्रामगृह अहमदपूर येथे पहिल्या कॅम्पचे आयोजन दि.18 नोव्हेंबर 2021 रोजी करण्यात आले होते.या वेळी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय हं.रा. बिरादार, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक (स्टेट बँक ऑफ इंडिया) कसबे ए.के., मुख्य प्रबंधक, स्टेट बँक ऑफ इंडिया अहमदपूर पंकज कुमार,क्षेत्रीय अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया अहमदपूर शिरिष कुमार, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पटेल जे.एस.व अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, अहमदपूर, कालीका देवी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. तिर्थ, यशोधर मत्स्यव्यवसाय सहाकारी संस्था मर्या. उजना, महादेव कोळी मत्स्यव्यवसाय सहाकरी संस्था मर्या. तेलगाव, कादरी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. चोबळी, मराठवाडा मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. शिरुरु ताजबंद,महाराष्ट्र मागासवर्गीय मत्स्यव्यवसाय सहाकरी संस्था मर्या. तांबट सांगवी, वाल्मीकी मत्स्यव्यवसाय सहाकरी संस्था मर्या. उगीलेवाडी, जयभवानी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. जढाळा, जय हनूमान मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. किनगाव, जंगलपरी मत्स्यव्यवसाय सहाकारी संस्था मर्या.किनगाव, कामामाता मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या.सुमठाणा या संस्थांचे एकूण 73 पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
उपस्थित पदाधिकारी व सभासद यांना मान्यवरांनी किसान क्रेडीट कार्ड या योजनेच महत्व विषद करुन त्यांच्या शंकाचे निरसन केले. या वेळी स्टेट बँक ऑफ इंडिया, अहमदपूर या शाखेकडे प्राप्त 26 अर्जाबाबत शिघ्रतेने कार्यवाही करण्याबाबत जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक (स्टेट बँक ऑफ इंडिया) यांनी संबंधितांना निर्देशित केले.
https://youtu.be/FkhUTw1OjTM