अंगणवाडी सेविका व मिनी सेविका पदभरतीसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन

पुणे : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वेल्हे कार्यालयांतर्गत अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांची रिक्त पदे भरण्यासाठी 18 नोव्हेंबर 2021 सायं. 6 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, अशी माहिती वेल्हे प्रकल्पाच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अंगणवाडी केंद्र गुंजवणे येथील अंगणवाडी सेविकेचे रिक्त पद तसेच निवी बदल झालेले घेव्हंडे आणि वडघर येथील मिनी अंगणवाडी सेविका या रिक्त पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्ज सादर करताना अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज व रंगीत छायाचित्र सादर करावा. अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका यांची शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असावी. अर्जदाराने शाळा सोडल्याच्या दाखल्याची सत्यप्रत व शैक्षणिक पात्रतेची सत्यप्रत उदा. 7 वी , 10 वी, 12 वी, पदव्युत्तर शिक्षण आदी सादर करावी. अर्जदाराची वयोमर्यादा 1 डिसेंबर 2021 रोजी 21 ते 32 वर्षे असावी. अर्जदाराने ग्रामसेवकाकडील रहिवासाचा मूळ दाखला अथवा स्वयंघोषणापत्र सादर करावे. त्यासोबत शिधापत्रिकेची सत्यप्रत जोडावी.

अर्जदार जर बालवाडी ताई असेल तर बालवाडी ताई ची नियुक्ती आदेश सादर करावी. तसेच अर्जदाराने लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करावे. अर्जदाराने सासरचे व माहेरचे नाव ही दोन्ही एकाच व्यक्तीची आहेत व अर्जदार जर विवाहित असेल तर विवाहाबाबतचे प्रतिज्ञापत्र (अफिडेव्हिट) किंवा विवाह नोंदणी दाखला आवश्यक आहे. अर्जदार जर अनुसूचित जाती / जमाती, मागासवर्गीय, इतर मागास वर्गीय असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांचा जातीचा दाखला सादर करावा. अर्जदार विधवा असल्यास गटविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.