निवृत्तीवेतन धारकांनी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर : जिल्हा कोषागार कार्यालयातंर्गत बँकेद्वारे निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांना दि. 1 डिसेंबर 2021 रोजी हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्राची यादी संबधित बँकेस माहे ऑक्टोंबर अखेर पाठविण्यात आली आहे. त्यावर आपल्या नावासमोरील रकान्यात दि. 30 नोव्हेंबर 2021 पुर्वी स्वत: उपस्थित राहून स्वाक्षरी करावयाची आहे. जेणेकरुन हयात असल्याचे प्रमाणपत्राची यादी कोषागाराला वेळीच प्राप्त होईल व त्यांचे माहे डिसेंबर 2021 पासूनचे निवृत्तीवेतन बँकेकडे वेळीच पाठविता येईल.

तसेच जे निवृत्तीवेतनधारक मनी ऑर्डरद्वारा निवृत्तीवेतन घेतात. त्यांनी आपले हयात प्रमाणपत्र राजपत्रित अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून दि.30 नोव्हेंबर पर्यंत कोषागारास पाठवावे. जे निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतन घेत आहेत. त्यांनी हयात असल्याचे प्रमाणपत्रासोबत (पुरुष) पुनर्विवाह न केल्याबाबतचे प्रमाणपत्र तसेच शासकीय सेवेत असल्यास अथवा नसल्यास तसे प्रमाणपत्र पाठवावे. निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्यांनी दोन्ही ठिकाणी आपल्या नावासमोर स्वाक्षरी करावी. हयात प्रमाणपत्र 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत कोषागारास प्राप्त न झाल्यास त्यांचे माहे डिसेंबर 2021 पासूनचे निवृत्तीवेतन बँकेकडे पाठविले जाणार नाही. याची नोंद घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी प्रीती खारतुडे यांनी कळविले आहे.

https://www.youtube.com/watch?v=G4H1kdtPdh0

Previous Post

पशुधनावर आधारित शेळीपालन, कुक्कूटपालन व दुग्धव्यवसाय प्रशिक्षण घ्या आणि कमवा बक्कळ पैसा

Next Post

सुधारित, हरित फटाकेच नागरिकांनी वापरावेत; पोलिस आयुक्तांचे आवाहन

Related Posts
मोठी बातमी : किशोर आवारे हत्याप्रकरणात राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आमदाराचा हात?

मोठी बातमी : किशोर आवारे हत्याप्रकरणात राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आमदाराचा हात?

पुणे : मावळातील तळेगांव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे (Kishore Aware) यांची काल दिवसाढवळ्या हत्या (Murder…
Read More
uddhav thackeray

आईचं दुध विकणारा शिवसेनेत नको, उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांचा दाखला देत सूचक इशारा

मुंबई – शिवसेनेच्या 56 व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना मार्गदर्शन केले . यावेळी विधान…
Read More
शनी

शनी महाराज बदलणार आपले स्थान; ‘या’ राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागणार

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शनीचा राशी बदल खूप महत्त्वाचा मानला जातो. 17 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 05.04 वाजता शनि…
Read More