मुंबई – काँग्रेस अध्यक्षा मा. सोनियाची गांधी, राहुलजी गांधी व अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता यांच्या निर्देशानुसार विशाल मुत्तेमवार यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया विभागाच्या राज्य अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत राज्य समन्वयक यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत.
विशाल मुत्तेमवार यांच्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री तथा विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष, काँग्रेस नेते यांच्याबद्दल खोटी माहिती पसरवून बदनामी केली जात आहे.या बदनामीच्या मोहिमेला चोख उत्तर देण्याबरोबरच पक्षाची ध्येयधोरणे, काँग्रेसचा विचार तळागळापर्यंत पोहवण्याच्या कामी विशाल मुत्तेमवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम उत्तम काम करेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
सोशल मीडिया टीमच्या इतर पदाधिकाऱ्यांमध्ये राज्य समन्वयक म्हणून विनय खामकर, डॉ. धनंजय क्षिरसागर, बिलाल अहमद, विजयानंद पोळ, श्लोकानंद डांगे, ज्ञानेश्वर चव्हाण, सुमित लोणारे, चैतन्य पुरंदरे, केतन गावडे, मनोज सिंग, अब्दुल सय्यद, डॉ. प्रवीण सरपाते, स्नेहा पाटील यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्याबद्दल मान्यवरांनी या सर्वांचे अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सोशल मीडियाची जबाबदारी दिल्याबद्दल विशाल मुत्तेमवार यांनी काँग्रेस अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी, राहुलजी, के. सी. वेणुगोपाल, एच. के. पाटील, नाना पटोले, रोहन गुप्ता यांचे आभार मानले.
https://youtu.be/FkhUTw1OjTM