अहमदनगर जिल्ह्यात भाजपाच्या विविध पदाधिकार्यांच्या नियुक्त्या; वैद्यकीय आघाडी सहसचिवपदी योगेश बेंद्रे – पाटील

अहमदनगर : जिल्ह्यात भाजपाचं प्राबल्य दिवसेंदिवस वाढतं आहे. याच परिस्थितीत कामाची विभागणी करणे देखील महत्त्वाचे झाले होते. याची माहिती पक्ष संघटनेतील महत्त्वाच्या लोकांना दिली गेली यावर तत्काळ कार्यवाही होत जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर झाल्या आहेत.

नुकतच योगेश बेंद्रे – पाटील यांना सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील (निसर्गोपचार व योगा) उल्लेखनीय काम केल्याची दखल घेत नगर जिल्हा सहसचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.एका छोटेखानी कार्यक्रमात आमदार प्रवीण दरेकर,आमदार नितेश राणे साहेब तसेच आमदार प्रसाद लाड आदींच्या उपस्थितीत बेंद्रे – पाटील यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी नियुक्ती संदर्भात बोलताना बेंद्रे – पाटील म्हणाले की “दिलेल्या संधीचे मी नक्कीच सोनं करण्याचा प्रयत्न करेल.आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश व तसेच वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे  गिरीश महाजन तसेच भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश संयोजक अभिजीत गोपछडे यांनी मला अहमदनगर जिल्ह्याचे वैद्यकीय आघाडी सहसचिव पदी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचेच आभार. त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार देणार नाही.आता यापुढे फक्त आपले काम दिसेल बास!”

योगेश बेंद्रे – पाटील हे सावित्रीबाईं फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विविध कामात खूप सक्रिय होते. अनेक लक्षवेधी आंदोलनं त्यांच्या काळात झाली आहे. एक उच्च शिक्षित आणि वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्तिला हे पद दिल्यामुळे बऱ्याच लोकांना याचा फायदा होईल असं बोललं जात आहे.