अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिची सोशल मीडियावर भावुक पोस्ट

पुणे : अप्सरा फेम मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड अक्टीव्ह असते. गेल्या काही काळात ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे.

आता तिने कोरोना काळाविषयी भाष्य करणारं एक पोस्ट केली आहे. यामध्ये सोनालीने कोरोना काळातील अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सोनालीने इन्स्टा पोस्ट करत म्हटले आहे की, ‘Looking at you 19th November!!!’ १८ महिन्यांनी पुन्हा एकदा चित्रपटगृहात आपला सिनेमा प्रदर्शित होणारे..हे पुन्हा एकदा स्वप्नपूर्ती सारखं वाटतंय..लहानपणापासून मोठ्या पडद्याची ओढ होती.त्याच्यावर झळकण्याची संधी १२ वर्षं सलग मिळाली. Pandemic मुळे आपण सगळ्यांनीच अतिशय वाईट दिवस पाहिले, हा मोठा पडदा ही त्याला अपवाद नाही.पण या अश्या वाईट गोष्टी संपाव्यात आणि आयुष्यात पुन्हा आनंदाचे दिवस यावेत म्हणून आपण “झिम्मा” हा खेळ खेळतो.

“आम्ही तो खेळायला सज्ज झालोय, १९ नोव्हेंबर पासून, तुम्ही पण या. सामील व्हा.”