Agniveer Bharti Melava | यांत्रिकी पायदळ केंद्र आणि शाळा, (पंकज जोशी स्टेडियम) अहमदनगर येथे १४ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत पुरुष आणि महिलाकरीता सैन्य अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
या मेळाव्याअंतर्गतअहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील निवड झालेल्या पुरुष उमेदवाराकरीता मुख्यालय रिक्रूटिंग झोन, पुणे यांच्या अंतर्गत अग्निवीर भरती मेळावा महाराष्ट्र आणि गुजरात, गोवा दमण, दीव आणि दादर, नगर हवेली केंद्रशासित प्रदेश या राज्यांतील निवड झालेल्या सुमारे ७ हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.
तरी पात्र उमेदवारांनी (Agniveer Bharti Melava) अहमदनगर येथे उपस्थित रहावे, असे आवाहनजिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
शपथविधीपूर्वी सागर बंगल्यावर हालचालींना वेग, शरद पवारांच्या खासदाराची फडणविसांशी भेट
भाजपकडे गृहमंत्रीपद मागणार का? एकनाथ शिंदे यांनी सांगितली मनातली गोष्ट | Eknath Shinde