‘सुभाष देशमुख यांनी शेतकर्‍यांच्या पाठीत खंजीर खुपसला,फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा’

सोलापूर – अप्रमाणित रासायनिक मिश्र खतांची (Chemical compost) विक्री केल्याप्रकरणी येथील लोकमंगल बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा परवाना रद्द ( Lokmangal Biotech Pvt. Ltd. revoked) करून, पोलिस कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय खत मंत्रालयाने राज्य शासनाला दिले आहेत (Lokmangal Scam). केंद्रीय पथकाने केलेल्या तपासणीत खतांचे नमुने अप्रमाणित आढळल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत असल्याची माहिती, कृषी विभागातर्फे देण्यात आली.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, अप्रमाणित मिश्र खतांची विक्री करणाऱ्या देशभरातील कंपन्यांवर केंद्रीय रसायने व खत मंत्रालयाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये राज्यभरातील सहा कंपन्यांचा समावेश आहे. केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाने देशभरातील काही मिश्र खतांच्या उत्पादक कंपन्यांची ३० एप्रिल २०२२ रोजी अचानक तपासणी केली. मंत्रालयाने आठ राज्यांमध्ये धाडी (Raid) टाकल्या. यामध्ये महाराष्ट्रा तील सहाकंपन्यांची मिश्र खते देखील अप्रमाणित आढळून आले आहेत. माजी मंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख (Former Minister and BJP MLA Subhash Deshmukh) यांच्या लोकमंगल समुहाशी संबंधित असलेल्या लोकमंगल बायोटेक कंपनीसहसांगलीतील वसंत अँग्रो टेक, नागपूर येथील विदर्भ मार्केटिंग फेडरेशन, कोल्हापुरातील शेतकरीसहकारी संघ,औरंगाबाद येथील देवगिरी फर्टिलायझर्स या संस्थांचा यामध्ये समावेश आहे.

दरम्यान, आता या सर्व प्रकरणावर स्वभिमानीचे राज्य प्रवक्ता रणजीत बागल (ranjeet Bagal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राजकारणात शेतकर्‍यांचे तारणहार म्हणवुन घ्यायचे आणि शेतकर्‍यांच्याच चुलीत पाणी ओतायचे हा प्रकार सुभाष देशमुख यांच्याकडून झालेला आहे. सुभाष देशमुख यांनी शेतकर्‍यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे.. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी अशी मी स्वाभिमानी कडुन मागणी करतो असं त्यांनी म्हटले आहे.