आयत्या नेत्यांच्या जोरावर राष्ट्रवादीला पडत आहेत महापौर पदाचे स्वप्न…

ncp leader

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यापासून पक्षाने आतापर्यंत सोलापूर महापालिकेच्या तीन निवडणुका लढविल्या आहेत. 16 जागांच्या पुढे त्यांना अद्याप यश मिळाले नाही. मात्र आता आयत्या नेत्यांच्या जोरावर राष्ट्रवादीला मात्र महापौर पदाचे स्वप्न पडत आहे. माजी महापौर महेश कोठे, नगरसेवक तौफीक शेख, आनंद चंदनशिवे या आयत्या नेत्यांच्या जोरावर राष्ट्रवादीने महापालिका काबिज करण्यासाठी कंबर कसली आहे.

2012 च्या महापालिका निवडणुकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी प्रचार सभा घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीचे 16 नगरसेवक विजयी झाले होते. मात्र 2017 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे चार नगरसेवक निवडून आले. ही त्यांची सर्वात सुमार कामगिरी झाली. गेल्या महापालिका निवडणुकीवेळी राज्यात भाजपाची सत्ता होती. त्यामुळे भाजपने पहिल्यांदा स्वबळावर सत्ता काबीज केली. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. सध्या राज्यात महाआघाडीच्या माध्यामातून राष्ट्रवादी सत्तेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत येण्यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत. याचा फायदा घेत राष्ट्रवादीने महापालिकेवर सत्ता काबिज करण्याचे नियोजन आखले आहे.

माजी महापौर महेश कोठे, नगरसेवक तौफिक शेख, नगरसेवक आनंद चंदनशिवे हे नेते राष्ट्रवादीत येण्यासाठी वेटींगवर आहेत. कोठे यांचे 14-15 नगरसवेक, शेख यांचे 6 नगरसेवक तर चंदनशिवे यांचे 3 ते 4 नगरसेवक असे 24 ते 25 आयते नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मिळून 35 ते 40 आकडा गाठण्याचे स्वप्न राष्ट्रवादीला पडत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत नंबर वनचा पक्ष होण्याची तयारी पक्षाने सुरू केली आहे.त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे सर्व पक्षाचे लक्ष लागले आहे.

पालकमंत्री भरणे यांची कसोटी

गेल्या निवडणुकीत भाजपचे विजयकुमार देशमुख पालकमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने प्रथमच महापालिकेवर सत्ता काबिज केली. आता पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे पालकमंत्री आहेत. त्यांची आता कसोटी लागणार आहे. सध्या अनेक दिग्गजांना पक्षात घेण्याचे नियोजन करून त्यांनी पहिला टप्पा तर यशस्वी केल्याचे बोलले जात आहे.

मानेही पक्षात आल्यास ताकद वाढणार

माजी दिलीप मानेही राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या बातम्या येत आहे. यदाकदाचित माने यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याय महापालिका निवडणुकीत पक्षाची ताकद आणखी वाढणार आहे. सध्या राष्ट्रवादीची बांधणी शहर आणि मध्य मतदारसंघात सुरू आहे. माने यांची दक्षिण मतदारसंघात ताकद आहेत. हद्दवाढ भागात त्यांचे सध्या चार-पाच नगरसेवक आहेत. त्यामुळे माने यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यास दक्षिण मतदारसंघात खास करून हद्दवाढ भागात पक्ष आणखी बळकट होणार आहे.

Previous Post
deshmukh - danave

‘वंदे भारत’ रेल्वेला सोलापुरात थांबा द्यावा, सुभाष देशमुख यांची रेल्वेमंत्री दानवेंकडे मागणी

Next Post
jayant patil

सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने मराठवाड्यातील कामे प्राधान्याने केली जातील – जयंत पाटील

Related Posts
छगन

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा; भुजबळांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश

नाशिक :- जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच अग्रस्थानी राहिली असून यंदाच्या निवडणुकीत देखील जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे…
Read More
हेमंत देसाई  

दिलगिरी मागितल्यानंतर देखील चंद्रकांतदादांवर शाईफेक होणे हे चुकीचेच; हेमंत देसाई यांची रोखठोक भूमिका 

मुंबई –   भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरीमध्ये शाईफेक करण्यात आली आहे.…
Read More
Puneet Balan Group | राज्य अजिंक्य स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूंना ‘पुनीत बालन ग्रुप’कडून इलेक्ट्रिक बाईक

Puneet Balan Group | राज्य अजिंक्य स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूंना ‘पुनीत बालन ग्रुप’कडून इलेक्ट्रिक बाईक

Puneet Balan Group | रोहा (जि. रायगड) या ठिकाणी नुकत्याच संपन्न झालेल्या ४२ व्या कुमार – मुली राज्य…
Read More