दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या स्वीय सहाय्यकाने केलेल्या गैरवर्तनाविरोधात आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. दिल्ली पोलीसांनी प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला आहे.
यासंदर्भात पोलीसांना निवेदन दिलं असल्याचं मालीवाल यांनी समाजमाध्यमावरील संदेशांत म्हटलं आहे. गेल्या १३ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विभव कुमार यांनी मालीवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. गुन्हे शाखेनेही तपास सुरू केला आहे, दिल्ली पोलिसांची टीम विभव कुमारचा शोध घेत आहे.
स्वाती मालीवाल यांच्या बाबतीत भाजप महिला मोर्चा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घराबाहेर बांगड्या घेऊन निषेध करत आहे. दरम्यान, या घटनेचं भाजपानं राजकारण करु नये अशी विनंती मालीवाल यांनी केली आहे. दुसऱ्या पक्षाच्या इशाऱ्यावरून त्या हे आरोप करत असल्याची टीका काही लोक करत आहेत, याबद्दल मालीवाल यांनी खेद व्यक्त केला आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप