शिवसेना (उबाठा) नेते अरविंद सावंत ( Arvind Sawant) यांनी शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांच्यावर केलेल्या टिप्पणीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, खुद्द सावंत यांनीच मीडियासमोर या संपूर्ण प्रकरणावर खेद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “विधानाचा वेगळा अर्थ काढून मला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे, ज्याचे मला दु:ख आहे. तरीही माझ्या वक्तव्यामुळे कोणाचे मन दुखावले गेले असेल, तर मी खेद व्यक्त करतो. मला त्यांच्या (शायना एनसी) बद्दल खेद आहे. मी त्यांचा आदर करतो आणि मी माझ्या 55 वर्षात कधीही त्यांचा अनादर केला नाही आणि आजही करणार नाही.”
उद्धव ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत पुढे म्हणाले की, “मी अपेक्षा करतो की, देशात महिलांचा सन्मान करताना पक्ष पाहू नये. स्त्रीला शूर्पणखा कोणी म्हटले? महिलेला जर्सी गाय कोणी म्हटले? मणिपूरमध्ये जे घडलं त्यात महिलांचा आदर होता का? आशिष शेलार यांनी आमच्या महापौरांसाठी दिलेल्या वक्तव्यावर कोणता एफआयआर दाखल करण्यात आला? महिलांच्या सन्मानाबाबत तुम्ही इतके संवेदनशील असाल तर महिलांचा अपमान करणाऱ्या या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे. माझ्या वक्तव्याने कोणी दुखावले असेल तर मी खेद व्यक्त करतो”, असे ते पुन्हा म्हणाले.
#WATCH मुंबई, महाराष्ट्र: शिवसेना(UBT) नेता अरविंद सावंत ने कहा, "जो वक्तव्य हुआ उसका अलग अर्थ लगाकर जान बूझ कर मुझे निशाना बनाया जा रहा है जिसका मुझे दुख है। फिर भी मेरे वक्तव्य से किसी के मन को ठेस पहुंची है तो मैं खेद व्यक्त करता हूं। मैं उनका सम्मान करता हूं और मैंने अपने 55… pic.twitter.com/C54z9iAlW9
— ANI_HindiNews (@AHindinews) November 2, 2024
संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली
यापूर्वी, शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनीही अरविंद सावंत यांच्या शायना एनसीवरील टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, अरविंद सावंत यांनी फक्त शिवसेनेचा उमेदवार बाहेरून आलेला आहे आणि ती इंपोर्टेड प्रॉडक्ट आहे, मग हा महिलेचा अपमान कसा काय? बाहेरच्या व्यक्तीने निवडणूक लढवली तर लोक म्हणतात की तो बाहेरून आला आहे. त्याला एवढा मोठा मुद्दा बनवण्याची गरज नाही.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार? नीलम गोऱ्हे यांची थेट निवडणूक आयोगात तक्रार
अर्जुन खोतकर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला; पहा नेमकं कारण काय ?
‘..म्हणून राज ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे’, असे का बोलले शिवसेना उबाठा नेते संजय राऊत?