Krunal Pandya | टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा हार्दिक पंड्या सध्या भारतीय क्रिकेट चाहत्यांचा हिरो आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला ट्रोल करणारे लोकही हार्दिकचे चाहते झाले आहेत. याची साक्ष खुद्द वानखेडे स्टेडियमने दिली आहे. टीम इंडियाचे विजेते खेळाडू वानखेडे स्टेडियमवर पोहोचले तेव्हा हार्दिक-हार्दिक नावाने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, हार्दिक पांड्याचा भाऊ कृणाल पंड्याने (Krunal Pandya) एक पोस्ट केली आहे जी व्हायरल होत आहे.
कृणाल पांड्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हार्दिकचा बालपणीचा फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो पुरस्कार स्वीकारताना दिसत आहे. यासह क्रुणालने हार्दिकचे कौतुक करत टीकाकारांवर निशाणा साधला. हार्दिकही भावनांनी भरलेली व्यक्ती आहे हे टीकाकार विसरले असल्याचे त्याने लिहिले आहे.
क्रुणालने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, हार्दिक आणि मी व्यावसायिक क्रिकेट खेळून जवळपास एक दशक झाले आहे. गेले काही दिवस आपण स्वप्नात पाहिले होते तितकेच संस्मरणीय होते. प्रत्येक देशवासियांप्रमाणे मलाही आमच्या संघाच्या यशाने आनंद झाला आणि माझ्या भावाने त्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याने मीही भावूक झालो. माझा भाऊ हार्दिकसाठी गेले 6 महिने खूप कठीण गेले. तो ज्या गोष्टीतून गेला होता त्याला तो पात्र नव्हता आणि एक भाऊ म्हणून मला त्याच्यासाठी खूप वाईट वाटले. आरडाओरडा करणारे लोक त्याच्याबद्दल खूप घाणेरडे बोलू लागले. हार्दिक हा देखील भावनांनी भरलेला माणूस आहे हे हे सर्व लोक विसरले होते. असे क्रुणालने लिहिले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Prakash Ambedkar | वसंत मोरे यांचे राजकारण आयाराम-गयाराम, त्यांना माणसं ओळखता येत नाहीत