Manoj Jarange | विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 11 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 2 जुलै आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास उरले असताना भाजपाने विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाच्या केंद्रीय समितीने 5 नावांवर शिक्कामोर्तब केला आहे. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांच्या नावांचा समावेश आहे.
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर होताच मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली ही चांगली गोष्ट आहे. आम्ही नाही म्हणल्याने भाजप थोडी त्यांना विधान परिषदेवर घेणार नाही… पंकजा मुंडेंना आमचा विरोध असण्याचा कारणच नाही. आम्ही यापूर्वीही कधी विरोध केला नाही. मात्र त्यांनीच आम्हाला विरोधक मानले. त्याला आम्ही काही करू शकत नाही. त्यांना पद मिळालं मराठ्यांना विरोध असण्याचे काहीच कारण नाही. त्यांच्या पाच पिढ्या राजकारणात होत्या. मराठ्यांनी त्यांना कधी विरोध केला नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप