रविश कुमार यांनी NDTV सोडताच विश्वंभर चौधरी यांनी घेतला ‘हा’ टोकाचा निर्णय

Mumbai – वरिष्ठ पत्रकार रविश कुमार यांनी अखेर NDTV इंडिया या वृत्तवाहिनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या वरिष्ठ कार्यकारी संपादकपदाचा राजीनामा दिला आहे. (Ravish Kumar resigns from NDTV) कंपनीनं देखील त्यांचा राजीनामा स्विकारला असून तो तात्काळ प्रभावानं लागू होईल असं सांगितलं आहे.

दरम्यान, रविश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनीही रविश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. डॉ. विश्वंभर चौधरी (Vishwambhar Choudhari) यांनी फेवरेट लिस्टमधून NDTV ला काढून टाकले आहे.

मी एनडीटीव्ही चॅनल फेवरेटमध्ये नंबर एकवर ठेवलं होतं. आज काढून टाकलं. शेठचा सावकार असलेल्या अदानीचं चॅनल बघावं एवढी वाईट वैचारिक वेळ आपल्यावर आलेली नाही. बिनडोक भक्तांना पाहू दे, असं यावेळी विश्वंभर चौधरी यांनी म्हटले आहे.

रविश कुमार हे अनेक दशकांपासून NDTVचा अविभाज्य भाग बनले होते. NDTVमध्ये रविश कुमार अनेक कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत होते. यांमध्ये आठवड्याचा शो हमलोग, रविश की रिपोर्ट, देश की बात आणि प्राईम टाईम या कार्यक्रमांचा समावेश होता. त्यांना दोनदा रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम अवॉर्ड आणि 2019 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.