ऑस्ट्रेलियन टीम पाकिस्तानात पोहोचताच खेळाडूंना धमक्या येऊ लागल्या

नवी दिल्ली : गेल्या २४ वर्षांतील पहिल्या पाकिस्तान दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ रविवारी येथे दाखल झाला. 6 आठवड्यांच्या या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा संघ तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. मात्र या मालिकेपूर्वीच वाद सुरू झाला आहे.

पाकिस्तानात पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला धमक्या मिळू लागल्या आहेत. द सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियन संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अॅश्टन अगरला पाकिस्तानात न येण्याची धमकी सोशल मीडियावर देण्यात आली आहे.यामुळे ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्यावर संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाने शेवटचा 1998 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर मर्यादित षटकांचे सर्व सामने जिंकत कसोटी मालिका १-० अशी जिंकली. 2009 मध्ये श्रीलंकेच्या संघ बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर परदेशी संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास कचरत आहेत. 5 वर्षांपूर्वी लाहोरमधील चर्चमध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटानंतर ऑस्ट्रेलियाने आपला दौरा रद्द केला होता.

पाकिस्तानने गेल्या सहा वर्षांत झिम्बाब्वे, श्रीलंका, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे यजमानपद भूषवले आहे, परंतु संपूर्ण द्विपक्षीय मालिकेसाठी पाकिस्तान दौरा करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ आहे.न्यूझीलंडनेही दौरा रद्द केलागेल्या वर्षी न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही देशांनी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा दौरा रद्द केला होता. मात्र, या दोन्ही संघांना या वर्षाच्या अखेरीस पाकिस्तानात यावे लागणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला कसोटी सामना ४ मार्चपासून रावळपिंडी येथे खेळवला जाणार आहे. कराचीमध्ये 12 ते 16 मार्च दरम्यान दुसरी कसोटी आणि त्यानंतर लाहोरमध्ये 21 ते 25 मार्च दरम्यान तिसरी कसोटी होणार आहे. रावळपिंडीत २९ मार्चपासून एकदिवसीय मालिका होणार आहे तर एकमेव टी-२० सामना ५ एप्रिलला होणार आहे.