नवाब मलिक मुसलमान आहेत म्हणूनच जेलमध्ये, मात्र संजय राऊत …; ओवेसींनी ठेवले खटक्यावर बोट 

मुंबई – एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी काल महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत ओवेसी यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले. नवाब मलिक मुस्लिम (Muslim) आहेत म्हणून जेलमध्ये आहे. शरद पवार मोदींना (Sharad Pawar) भेटेले तेव्हा त्यांना राऊतांवर कारवाई करु नका म्हणून सांगायला राऊतांची आठवण आली. मात्र त्यांना यावेळी नवाब मलिकांची आठवण आली नाही का? असा सवाल ओवैसी यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडीला केला आहे.

यावेळी बोलताना ओवैसी म्हणाले,  नवाब मलिक यांना सरकारने सोडले पाहिजे. सर्वच राजकीय पक्षांना वाटत आहे आपण जेलमध्ये नाही गेलो पाहिजे. मात्र आमच्या पार्टीतल्या मुस्लिमांना जेलमध्ये टाका. असे यांचे धोरण आहे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत जाऊन मोदींना भेटतात. तेव्हा मीडियाने सांगितलं की पवार मोदींना म्हणाले की संजय राऊतांवर कारवाई करु नका, राऊतांना जेलमध्ये टाकू नका. त्यांची चौकशी करु नका. मग मी विचारतो राष्ट्रवादीला की पवारांना मलिक का नाही आठवले? असा सवाल यावेळी ओवैसी यांनी केला.

नवाब मलिक हे तुमच्याच पार्टीचे आहेत. तेव्हा मलिकांचेही नाव घ्यायचे होते ना, मात्र नवाब मलिकांना जेलमध्ये टाकलं आणि संजय राऊतांचं नाव घेतलं. मग राष्ट्रवादीला संजय राऊत हे नवाब मलिक यांच्यापेक्षा जास्त प्रिय झाले का? असा सावल ओवैसी यांनी केला.