सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी महाराष्ट्रात “सायबर सुरक्षा धोरण” तयार करण्याबाबत आशिष शेलार यांनी केली मोठी घोषणा

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी महाराष्ट्रात “सायबर सुरक्षा धोरण” तयार करण्याबाबत आशिष शेलार यांनी केली मोठी घोषणा

मुंबई | महाराष्ट्र राज्यात सायबर सुरक्षा धोरण ( Cyber ​​Security Policy) तयार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्याचे माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज 2025 च्या सायबर सुरक्षा धोरण कार्यदलाची स्थापना केल्याचे जाहीर केले. या कार्यदलाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आयटी आणि डिजिटल पायाभूत सुविधांची सुरक्षा आणि संरक्षण करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सरकारमार्फत तब्बल 800 शासकीय सेवा नागरिकांना ऑनलाइन ( Cyber ​​Security Policy) माध्यमातून दिल्या जातात. तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत असून तो आपल्या दैनंदिन जीवनातील सर्व पैलूंना प्रभावित करत आहे. सायबर गुन्हेगारी आणि बेकायदेशीर सायबर/डिजिटल गुन्ह्यांचा वाढता धोका ओळखता महाराष्ट्र सायबर सुरक्षा धोरण 2025 हे राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण 2013 आणि राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण 2020 या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित असणार आहे असे देखील राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जाहीर केले.

नागरिक, शैक्षणिक संस्था, उद्योग, स्टार्टअप्स आणि सरकारी क्षेत्रासाठी एक मजबूत सायबर सुरक्षा प्रणाली निर्माण करणे, सरकारी आणि निमसरकारी आयटी पायाभूत सुविधांची सुरक्षा करणे हा या धोरणाचा मुख्य हेतू आहे. तसेच महाराष्ट्र सायबर सुरक्षा धोरणाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार नागरिकांना सुरक्षित डिजिटल सेवा सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

भाजप सत्ताधारी आणि प्रशासनाने मिळून पुण्याची जागतिक नाचक्की करून दाखवली : Aam Aadmi Party

हिंदुत्वाचा अजेंडा नेण्यासाठी भाजप मंत्र्यांना संघाचे नेते कानमंत्र देणार

फडणवीसांनी करुणा शर्माला अनेकदा विमानाने माहेरी सोडलं | Trupti Desai

Previous Post
महाराष्ट्र राज्य ठरले भारतातील पहिले AI धोरण ठरवणारे राज्य!

महाराष्ट्र राज्य ठरले भारतातील पहिले AI धोरण ठरवणारे राज्य!

Next Post
Pioneering Progress: Maharashtra takes the lead with India’s First AI Policy

Pioneering Progress: Maharashtra takes the lead with India’s First AI Policy

Related Posts
जनतेच्या प्रश्नावर शिंदे सरकारला अधिवेशनात जाब विचारु:- नाना पटोले

जनतेच्या प्रश्नावर शिंदे सरकारला अधिवेशनात जाब विचारु:- नाना पटोले

मुंबई –पावसाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न घेऊन भाजपाप्रणित शिंदे सरकारला काँग्रेस पक्ष प्रश्न विचारेल. शेतकरी, कामगार, गरिब, महिला, कायदा…
Read More
ravindra koushik

पडद्यामागचे खरे सूत्रधार: मातृभूमीसाठी सर्वोच्च बलीदान देणारे ‘ब्लॅक टायगर’ रवींद्र कौशिक…

विनीत वर्तक – भारताच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात अनेक लोकांचं रक्त सांडलं आहे. आजही त्यांच्या बलिदानाची दखल घेतली जात…
Read More
Ajit Pawar | सत्तेत सहभागी झाल्याने नाशिक जिल्ह्यात दहा हजार कोटींहून अधिक विकासाची कामे करता आली

Ajit Pawar | सत्तेत सहभागी झाल्याने नाशिक जिल्ह्यात दहा हजार कोटींहून अधिक विकासाची कामे करता आली

Ajit Pawar | मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्याचा सर्वांगीण विकास झाल्याने येवल्याच्या पैठणीला राजाश्रय मिळाला. आणि आज येवला…
Read More