Ashish Shelar | शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ‘शिवकल्याण राजा’ कार्यक्रमाचे आयोजन

Ashish Shelar | महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला तिथीनुसार 350 वर्षे पूर्ण होत असून या निमित्ताने मुंबई भाजपाच्या वतीने ‘शिवकल्याण राजा’ या (Shiv Kalyan Raja) भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम गुरुवारी (ता.२०) रोजी, सायंकाळी ६.३० वाजता माटुंगा (प.) येथील यशवंत नाट्यगृहात होणार आहे.

कार्यक्रमात सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ तसेच कोकण विकास आघाडी यांच्या सहकार्याने मुंबई भाजपा आयोजित गणेशोत्सव स्पर्धा २०२३ “मुंबई” देखावा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. या सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

भारुड, गोंधळ, पोवाडा, शिवराज्याभिषेक सोहळ्याचा नाट्यानुभव अशा विविधतेने नटलेला या भव्यदिव्य कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांनी मोठे संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like