सदाभाऊ खोतांना हॉटेलचं बिल मागणाऱ्या व्यक्तीला झाली अटक; जाणून घ्या प्रकरण नेमकं काय आहे ?

पंढरपूर : माजी मंत्री सदाभऊ खोत यांना हॉटेलमधील जेवणाच्या बिलावरुन भाडणारा व्यक्ती आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सदाभाऊ खोत यांच्याशी वाद घालणारे हॉटेल मालक अशोक शिनगारे यांना आता वाळू चोरी प्रकरणी पोलिसांनी अटक केल्याची माहिती (Pandharpur Police) पंढरपूर पोलिसांनी दिली आहे.

पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथील आण्णा पाटील हायस्कूलजवळ एका वाहनातून अवैध वाळू टाकली जात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पो.नि.धनंजय जाधव यांनी पथकास घटनास्थळी पाठवून दिले.

वाहतूक व वाळू उपसा परवाना आहे का? याची चौकशी केली तेव्हा सांगोला येथून अवैध वाळू उपसा करून तिसंगी येथे आणल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहन व चालक अशोक शिनगारे व तुषार सलगरे (रा.मांजरी, ता.सांगोला) यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.