आशिया चषक क्रिकेट स्पर्धा पाकिस्तानऐवजी अन्य देशात खेळवली जाण्याची शक्यता

नवी दिल्ली – आशिया चषक क्रिकेट स्पर्धा (Asia Cup) पाकिस्तान (Pakistan) ऐवजी अन्य देशात खेळवली जाण्याची शक्यता आहे. आशियाई क्रिकेट परिषद याबाबतचा पर्यायी स्थळाचा निर्णय पुढील महिन्यात घेण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह (Jay Shah) आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाचेचे अध्यक्ष नजम सेठी यांनी काल बहरीनमध्ये औपचारिक बैठकीत या विषयावर चर्चा केली.

या आपत्कालीन बैठकीला आशियाई क्रिकेट परिषदेच्या सदस्य देशांचे प्रतिनिधि उपस्थित होते. यावर्षी सप्टेंबरमध्ये आशिया चषक पाकिस्तानमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र तिथे आता स्पर्धा होण्याची शक्यता फारच कमी असल्याचं बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. अफगाणिस्तान क्रिकेट असोसिएशनसाठी वार्षिक अंदाजपत्रक सहा वरून 15 टक्के करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.