राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ, शेतकऱ्यांसाठी नाही – काँग्रेस

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या बंद संदर्भात व्यापाऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.

हा बंद सुरु असताना कॉंग्रेसचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन घेऊन राजभवनात दाखल झाले. मात्र, राजभवनात त्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काही भेटले नाहीत. यावरून कॉंग्रेस नेते आणि वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी राज्यपालांवर जोरदार हल्लबोल केला आहे.

राजभवनात राज्यपाल नव्हते , आतमध्ये आम्ही आंदोलन केलं, शेतकऱ्यांची बाजू ऐकून घ्यायची नव्हती म्हणून राज्यपाल भवनात नव्हते. आम्ही शेतकऱ्यांची मागणी घेऊन गेलो. राज्यपाल कंगना राणावत, भाजप नेत्यांना वेळ देतात पण शेतकऱ्यांसाठी त्यांकडे वेळ नाही. असा घणाघात अस्लम शेख यांनी केला आहे.

तर, भाजप नेत्याची भाषा दादागिरीची आहे , बंदला सपोर्ट मिळू नये म्हणून देशमुख यांच्यावर कारवाई पुन्हा दाखवली जात आहे, असा हल्लाबोल देखील अस्लम शेख यांनी केला.

हे देखील पहा