Chitra Wagh | “असले दुटप्पी धंदे उद्धवजी…”, तेजस ठाकरेंच्या अनंत अंबानींच्या संगीत सोहळ्यातील डान्सवरुन चित्रा वाघ यांचा निशाणा

Chitra Wagh | "असले दुटप्पी धंदे उद्धवजी...", तेजस ठाकरेंच्या अनंत अंबानींच्या संगीत सोहळ्यातील डान्सवरुन चित्रा वाघ यांचा निशाणा

Chitra Wagh | सध्या संपूर्ण देशात मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या लेकाच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. संगीत, हळद असे अनेक कार्यक्रम पार पडत असून राजकीय नेत्यांपासून बॉलीवूडकरांपर्यंत अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहत आहेत. इतकच नव्हे तर ही मंडळी या सोहळ्यांना उपस्थित राहून ते सोहळे गाजवत देखील आहेत. मात्र अंनत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) पार पडलेल्या संगीत सोहळ्यात उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांच्या नृत्याने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं.

अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात बॉलीवूडकरांसह तेजस ठाकरेही थिरकताना दिसले. सोशल मीडियावर सध्या तेजस ठाकरेंचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. काजोल आणि शाहरुखच्या गाण्यावर तेजस ठाकरेंनीही ताल धरला. पण तेजस ठाकरेंच्या या नृत्यावर सत्ताधाऱ्यांनी मात्र चांगलाच निशाणा साधला.

भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत लिहिले की, कमालच म्हणायची बुवा…ज्या अंबानींच्या नावाने हे दिवस-रात्र शिमगा करत होते, काही दिवसांपासून त्यांच्या लगीनघरातले जणू काही यजमान बनून वावरताहेत…थोरल्या चिरंजीवांनी सोयऱ्या-धायऱ्यांचंच लग्न असल्यासारखं अंगाला हळद लावलीय. धाकटे करवले बनून संगीत कार्यक्रमात शेवटच्या रांगेत का होईना, पण अंगविक्षेप करताना सगळ्या महाराष्ट्राने पाहिले…

ठाकरे कुटुंबाने घरचंच लग्न असल्यासारखा उत्साह दाखवण्याबाबत आमचं काही म्हणणं नाही. पण, एकीकडं स्वतःच तोरणदारी मिरवायचं आणि माघारी महाराष्ट्राच्या जनतेला भडकवण्याची लगीनघाई माजवायची, असले दुटप्पी धंदे उद्धवजी आणि त्यांनी मातोश्रीवरून आणलेल्या वऱ्हाडाने करू नयेत, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधलाय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Jayant Patil | मेघा इंजीनियरिंग कंपनीवर सरकारची 'मेगा' मेहरबानी, जयंत पाटलांनी उघडकीस आणला मोठा गैरप्रकार

Jayant Patil | मेघा इंजीनियरिंग कंपनीवर सरकारची ‘मेगा’ मेहरबानी, जयंत पाटलांनी उघडकीस आणला मोठा गैरप्रकार

Next Post
Car Tips for Monsoon | मुंबईच्या मुसळधार पावसात जीव वाचवा, पाण्यात बुडलेल्या कारमधून अशा प्रकारे बाहेर पडा

Car Tips for Monsoon | मुंबईच्या मुसळधार पावसात जीव वाचवा, पाण्यात बुडलेल्या कारमधून अशा प्रकारे बाहेर पडा

Related Posts
YouTube ची कठोर कारवाई : भारतात सर्वाधिक 29 लाख व्हिडिओ हटवले

YouTube ची कठोर कारवाई : भारतात सर्वाधिक 29 लाख व्हिडिओ हटवले

YouTube ने आपल्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या व्हिडिओंवर कठोर कारवाई ( YouTube video) केली आहे. कंपनीने दिलेल्या…
Read More
Narendra Modi

ढोंगी राष्ट्रवादाच्या नावाखाली भाजपा रक्तरंजित कारवायांमध्ये सक्रीय; कॉंग्रेसचा आरोप

मुंबई – भारतीय जनता पक्ष (BJP) ढोंगी राष्ट्रवादाच्या नावाखाली देशातील वातावरण रक्तरंजित करत असून अनेक घातपाती कारवाया व…
Read More
शरद पवारांच्या राष्ट्रवादी अध्यक्षपद राजीनाम्याच्या निर्णयावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

शरद पवारांच्या राष्ट्रवादी अध्यक्षपद राजीनाम्याच्या निर्णयावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : गेल्या ६० वर्षांपासून देशाच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar)…
Read More