अतिक्रमण हटवण्याच्या मोहीमे दरम्यान संघर्ष; दोन जणांचा मृत्यू

दारंग – अतिक्रमण हटवण्याच्या मोहीमे दरम्यान आसामच्या दारंग जिल्ह्यात काल संघर्ष होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. धोलपुर गावात ही घटना घडली.

राज्य सरकारनं या प्रकरणी गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अतिक्रमण काढण्याचं काम सुरु असताना निदर्शकांनी पोलिसांवर हल्ला केल्यानं पोलिसांनी कारवाई केली. यावेळी झालेल्या संघर्षात दोन जणांचा मृत्यू झाला.

जखमी झालेल्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, कायदा हातात घेण्यासाठी जनतेला चिथावणी देऊ नये, असं आवाहन सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं विरोधी पक्षांना केलं आहे.