करमाळा | येणाऱ्या करमाळा विधानसभा मतदारसंघात (Assembly Elections 2024) महायुतीचा उमेदवार सर्व ताकतीने निवडून आणण्याची जबाबदारी शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांच्या असताना भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केलेले नारायण पाटील यांना करमाळ्यात प्रमोट करत आहेत. हे चुकीचे असून त्यांनी करमाळ्याच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या संघटनेमध्ये मिठाचा खडा टाकू नये असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात चिवटे म्हणाले, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी आमदार नारायण पाटील यांना करमाळा विधानसभेसाठी (Assembly Elections 2024) पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.असे असताना भाजपचे आमदार मोहिते पाटील नारायण पाटील यांना तालुक्यात घेऊन कार्यकर्त्यांच्या बैठकी घेत आहेत. नुकतेच त्यांनी जेऊर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निधीतून होत असलेल्या जेऊर येथील तीन कोटी 42 लाखाच्या कामाचे कोणताही पक्षाचा सरकारचा प्रोटोकॉल न पाळता शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता माजी आमदार नारायण पाटील यांचे उपस्थितीत उद्घाटन करून याचे क्रेडिट नारायण पाटलाला देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
त्याचबरोबर जेऊर ग्रामपंचायत येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नारायण पाटील यांना आमदार करण्याविषयी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.रणजीत सिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. करमाळ्याची जागा शिवसेनेच्या वाट्याची आहे. शिवसेना करमाळा विधानसभा सर्व ताकतीने लढवणार आहे असे असताना भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील करमाळ्यात वेगळी अप्रत्यक्ष राष्ट्रवादीला पाठिंबा देणारी भूमिका मांडत आहेत.या प्रकारामुळे शिवसेना-भाजप युतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज आहेत
भाजपचे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी भाजप शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणे गरजेचे असताना ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या येणाऱ्या विधानसभेच्या उमेदवाराला आत्तापासूनच करमाळातून ताकद देत आहेत. याची दखल भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी घ्यावी अशी विनंती ही जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे
आदिनाथ कारखान्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमलेले प्रशासक मंडळ बदलण्यासाठी विशेष प्रयत्न करून रणजीत सिंह मोहिते पाटलांनी आपले समर्थक प्रशासक म्हणून निवडून घेतले. यामुळे ही शिवसेनेचे पदाधिकारी नाराज असल्याचे महेशचिवटे यांनी सांगितले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :